अभिनेते नाना पाटेकर यांनी सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी सुशांतच्या पाटण्यातील घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. सुशांतच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून नानांनी श्रद्धांजली वाहिली. यानंतर त्याच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. जवळपास अर्धा तास नाना पाटेकर सुशांतच्या कुटुंबीयांसोबत होते.
सुशांतच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी आलेल्या नाना पाटेकर यांनी सीआरपीएफच्या ४७ व्या बटालियनच्या कॅम्पसलादेखील भेट दिली. त्यावेळी त्यांनी सुशांतच्या आत्महत्येबद्दल दु:ख व्यक्त केलं. 'सुशांत सिंह अतिशय अद्भुत कलाकार होता. तो खूप सुंदर अभिनय करायचा. तो आता या जगात नाही, यावर विश्वासच बसत नाही. मी माझा मुलगा गमावल्यासारखं वाटतंय. सुशांत आता आपल्यात नाही, हे सत्य अजूनही मला पचवता येत नाही. सुशांत लहान होता. अजून ३० वर्षे तो काम करू शकत होता. सुशांतसारखी मुलं फार कमी असतात,' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
#lokmat #NanaPatekar #SushantSinghRajput #Lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber